पुण्यातील भारती विद्यापीठ आय.एम.ई.डी.मध्ये योग दिवस साजरा

पुण्यातील भारती विद्यापीठ आय.एम.ई.डी.मध्ये योग दिवस साजरा

पुणे,दि.२१ :-भारती अभिमत विद्यापीठाच्या  'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट (आय.एम.ई.डी.) मध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग मार्गदर्शक सुषमा येंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  'आयएमईडी'  चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर ,प्राद्यापक वर्ग,कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी योग प्रात्यक्षिके केली. 'आयएमईडी' च्या  पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला.