दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी ; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी ; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

पुणे,दि.१७ :-  दहावीचा  निकाल आज १७ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा करण्यात आली आहे.
यंदा दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला असून यामध्ये 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर राज्यात कोकण विभाग  पहिला आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाली नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर आज ही प्रतिक्षा संपली आहे.
जिल्हानिहाय यादी -
कोकण - 99.27 टक्के
पुणे - 96.16 टक्के
नागपूर - 97.00 टक्के
औरंगाबाद - 96.33 टक्के
मुंबई - 96.94 टक्के
कोल्हापूर - 98.50 टक्के
अमरावती - 96.81 टक्के
नाशिक - 95.90 टक्के
लातूर - 97.27 टक्के

निकाल कुठे पाहाल ? -
www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in