मंगला टॉकिज परिसरात तरुणाचा खुन करणाऱ्या 17 आरोपी 48 तासांच्या आत, पुणे शहर गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात

मंगला टॉकिज परिसरात तरुणाचा खुन करणाऱ्या 17 आरोपी 48 तासांच्या आत, पुणे शहर गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात

पुणे,दि.१८ (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :- पुणे शहरातील मंगला टॉकिज परिसरात तरुणाचा खुन करणाऱ्या १७ आरोपींना ४८ तासात अटक, पुणे शहर गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई नितीन मोहन म्हस्के वय-35 रा. ताडीवाला रोड) याचा  खून  करण्यात आला होता. हा प्रकार बुधवारी (दि. १६) पहाटे १.१५  वाजण्याच्या सुमारास  घडला होता. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडील  सहा पथके तयार केली होती. गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत १७ आरोपींनी विविध ठिकाणावरुन ताब्यात घेतले आहे.
खून केला.याबाबत सतिश वानखेडे याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या, मलिक उर्फ मल्या कोळी, इम्रान शेख, पंडीत कांबळे, विवेक उर्फ भोला, लॉरेन्स पिल्ले, सुशील सूर्यवंशी, मनोज हावळे, आकाश उर्फ चडी, रोहन उर्फ मच्छी यांच्यासह इतर ७ ते ८ टोळक्यान वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गुन्हा केल्यानंतर आरोपी पुणे शहरातून फरार झाले होते. आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखेकडली युनिट -१, युनिट -२, खंडणी विरोधी पथक -१ दरोडा व वाहन चोरी पथक -१ असे सहा पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत माहिती घेत असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर उर्फ यल्ल्या व त्याचे साथीदार लातुर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटक राज्यातील रायचुर, बेळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्याद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्नाटकात जाऊन आरोपींचा शोध घेऊन ५ जणांना ताब्यात घेतले. सागर उर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (वय-३५ रा. ताडीवाला रोड, सध्या रा. हडपसर), सुशिल अच्युतराव सुर्यवंशी (वय-२७ रा. ताडीवाला रोड, पुणे), शशांक उर्फ वृषभ संतोष बेंगळे (वय-२१ रा. ताडीवाला रोड), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (वय-२८ रा. बुद्धविहार जवळ, ताडीवाला रोड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला रायचुर, हुबळी येथील दुर्गम भागात शोध घेऊन ताब्यात घेतले.तसेच पुण्यातील पथकाने विश्रांतवाडी, पुणे शहर, चौफुला, पुणे ग्रामीण भागातून ५ आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मलेश उर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय-२४ रा. भाजी मार्केट, ताडीवाला रोड), किशोर संभाजी पात्रे (वय-२० रा, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे), साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय-२० रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड), गणेश शिवाजी चौधरी (वय-२४ रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), रोहित बालाजी बंडगर (वय-२० रा. ताडीवाला रोड) यांना अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या दोन पथकांनी या गुन्ह्यातील एकूण १० आरोपींना ताब्यात घेतले.याशिवाय खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे  यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केशवनगर, मुंढवा, पुणे शहर भागात आरोपींचा शोध घेतला. पथकाने विवेक उर्फ भोला भोलेनाथ नवघरे (वय-२५ रा. मुळीक कॉम्पलेक्स, रामवाडी), इम्रान हमीद शेख (वय-२१ रा. झेड कॉर्नर, केशवनगर) यांना ताब्यात घेतले.
तसेच दरोडा व वाहन चोरी पथक एकचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या
नेतृत्वाखाली पथकाने खडकवासला, पुणे ग्रामीण  भागातून आकाश उर्फ चड्डी सुनिल गायकवाड
(वय-२२ रा. उत्तमनगर) याला ताब्यात घेतले.गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई  यांच्या नेतृत्वातील पथकाने खराडी, कल्याणीनगर याभागात आरोपींचा शोध घेऊन चार जणांना ताब्यात घेतले. लॉरेन्स राजु पिल्ले (वय-३६ रा. ताडीवाला रोड), मनोज उर्फ बाबा विकास हावळे (वय-२३ रा. जोगमाया मिनीमार्केट जवळ, ताडीवाला रोड), रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय-२३), विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय-२२ दोघे रा. नवरत्न तरुण मंडळाजवळ, ताडीवाला रोड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चार दुचाकी,
५ मोबाईल असा एकूण  जप्त केला आहे.
गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये गुन्ह्यातील मुख्य ९ आरोपी व ८ संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन
पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या १० आरोपींवर पुणे शहरातील बंडगार्डन व
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात  गंभीर गुन्हे दाखल आहेत.सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, एमपीडीए, आर्म अॅक्ट अस एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.सुशिल सूर्यवंशी याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी यासारखे ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.शशांक उर्फ वृषभ बेंगळे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
किशोर पात्रे याच्यावर गंभीर दुखापत, जबरी चोरी असे दोन गुन्हे दाखल आहेत.साहिल उर्फ सल्ल्या कांबळे याच्यावर गंभीर दुखापतीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
गणेश चौधरी याच्यावर गंभीर दुखापत, बलात्कार असे तीन गुन्हे दाखल आहेत.
रोहित बंडगर याच्यावर वाहन चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.मनोज उर्फ बाबा हावळे याच्यावर खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
रोहन उर्फ मच्छी तुपधर याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे पाच गुन्हे दाखल आहेत.
विकी उर्फ नेप्या कांबळे याच्यावर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे असे दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद,युनिट -२ वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, खंडणी विरोधी पथक -१ वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,दरोडा व वाहन चोरी पथक -१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार
यांच्या पथकाने केली.