ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची देशासाठी 'सुवर्ण' कामगिरी

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची देशासाठी 'सुवर्ण' कामगिरी

पुणे,दि.३१:- विनिपेग (कॅनडा) येथे झालेल्या 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम' स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी. अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी कुस्तीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.
पोलिस अँड फायर गेम' या स्पर्धेत विविध देशांतील पोलिस सहभागी झाले होते. शनिवारी तर दि.२९ रोजी झालेल्या खेळात चौधरी यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोता यांच्याशी झाला. त्यात चौधरी यांनी ११-०८ अशा फरकाने साहोता यांचा पराभव केला. अंतिम सामना अमेरिकेच्या जे. हेलिंगर यांच्याबरोबर झाला. यामध्ये चौधरी यांनी १० गुणांची आघाडी घेऊन सामना ११-०१ ने जिंकून देशाला १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून दिले.
सुवर्ण कामगिरीबाबत चौधरी म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून देशासाठी सुवर्णपदक मिळवू शकलो याचा मोठा आनंद आहे. माझे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरला. कुटुंब, मित्र आणि माझ्या गावाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले."