तिळवण तेली समाजाची पुणे 82 भवानी पेठ सदस्य नोंदणी सुरू

तिळवण तेली समाजाची पुणे 82 भवानी पेठ सदस्य नोंदणी सुरू

पुणे, दि. २०: -पुणे तिळवण तेली समाज पुणे नोंदणी क्रमांक ए-५१७ मंडळाच्या २०२३ २०२६ या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. सभासद नोंदणीकरिताचे फॉर्म २० ते ५ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत ८२ भवानी पेठ, पुणे- ४११००२ येथील संस्थेचे व्यवस्थापक (दिवाणजी) यांच्याकडे उपलब्ध असतील. सर्व समाजबांधवांनी उपरोक्त कालावधीमध्ये आपापल्या विभागातून फॉर्म भरून विहित फी भरून कार्यालयात जमा करावेत.
कुटुंबातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना वार्षिक प्रवेश फी भरून सभासद होता येणार आहे. फॉर्मसोबत फार्ममध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत सभासद नोंदणीची मुदत वाढविली जाणार नाही.
प्राथमिक सभासद यादी १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. त्यावर हरकत/दुरुस्त दि. २५ ऑक्टोबरपर्यंत घेता येईल. त्यावर छाननी होऊन अंतिम सभासद आणि मतदार यादी ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांनी दिली.