आळंदी,दि.२३ :- प्रतिनिधी आळंदी येथील देहूफाटा परीसरात वेश्याव्यवसाय फोफावला असून त्याचा स्थानिक महिलांना,नागरिकांना त्रास होत होता,त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते,या प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असून याप्रकरणी आळंदी ग्रामस्थांनी वेश्याव्यवसाय प्रकरणी कायमस्वरुपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांना करण्यात आली,याप्रकरणाची दखल घेत गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलिस प्रशासनाला सूचना करत आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये असे प्रकार होणे योग्य नाही यापुढे असे प्रकार होता कामा नये याची दक्षता घ्यावी आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशा सूचना पोलीस प्रशासनाला गृहमंत्री वळसे-पाटील यांनी आळंदी येथे दिल्या.
आंबेगाव तालुक्यातील पिंपळवंडी येथील नागरिकांनी श्री क्षेत्र आळंदी येथे श्रीराम धर्मशाळा ही नवीन इमारती बांधली त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये सदिच्छा भेट तसेच धर्मशाळेचे ज्येष्ठ विश्वस्तांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा यावेळी वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.त्यानंतर त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील आणि विश्वस्त अभय टिळक यांनी वळसे-पाटील यांचा संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती,सार्थ ज्ञानेश्वरी देऊन सत्कार केला याप्रसंगी पोलिस उपायुक्त मंचक इप्पर,सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे,वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,माजी सभापती डी.डी.भोसले पाटील,आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंगभैया पाचुंदकर,सचिव अजित वडगावकर,माजी नगरसेवक प्रदीप बवले,संदेश तापकीर,सतीशबापू कुऱ्हाडे,प्रसाद बोराटे,ज्ञानेश्वर गुळुंजकर,मंगला वेळकर,रूपालीताई पानसरे,गौरी गोळे,पुष्पाताई कुऱ्हाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
आळंदी प्रतिनिधी:-दिनेश गणपत कुऱ्हाडे