पत्नी व तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने केली आत्महत्या

पत्नी व तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने केली आत्महत्या

पुणे,दि.१५:- पत्नी आणि तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास  घेऊन आत्महत्या 
पुणे शहरातील खडकी येथे घडली आहे. याप्रकरणी  चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 समीर निवृत्ती नाईक (वय 38, रा. खडकी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी उषा, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय 65, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. समीर आणि पत्नी उषा यांना एक 12 वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या चार वर्षापासून उषा आणि तिच्या माहेरचे लोक समीर काही घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे. 
पत्नी आणि नातेवाईकांच्या मानसिक त्रासामुळे समीर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.
समीरच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलीस निरीक्षक कदम  तपास करत आहेत.