बालेवाडीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा , 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

बालेवाडीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा , 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे,दि.०६:- पुणे शहरातील बाणेर परिसरातील बालेवाडी गावातील दसरा चौक येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने  छापा टाकून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत 28 जणांवर गुन्हा  दाखल करण्यात आला असून 17 जणांना अटक  केली आहे तर 11 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई  गुरुवारी (दि. 4) बालेवाडी गावातील दसरा चौकात करण्यात आली.दसरा चौकात एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण  व मुंबई मटका जुगार पैशावर खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून खेळणारे व खेळवणारे 17 आणि फरार झालेल्या 11 जणांवर चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी या कारवाईत घटनास्थळावरुन 8 हजार 950 रोख 60 हजार रुपये किमतीचे 12 मोबाईल, 70 हजार रुपयांची दुचाकी, 13 हजार 100 रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 52 हजार 050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे 
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक,
महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके श्रीकांत चव्हाण,
पोलीस अंमलदार कर्पे, राणे, मोहीते, चव्हाण, पुकाळे, माने, कांबळे, चव्हाण, जमदाडे, कोळके, कोळप, पवार, पाटील यांच्या पथकाने केली आहे.