
पुणे,दि.१०:- गायकांना करिअरसाठी योग्यवेळी योग्य संधी मिळणे आवश्यक असते. पुणे आयडॉलच्या माध्यमातून ही संधी मिळाली आहे त्याचे सोने करा, असे मत ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी व्यक्त केले. सोमेश्वर फाउंडेशनच्या पुणे आयडॉल स्पेर्धेचे उद्घाटन करताना मराठे बोलत होत्या.
माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, निलेश निकम, उदय महाले, आदित्य माळवे, दत्ता खाडे, रविंद्र साळेगावकर, बिपीन मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठे म्हणाल्या, आपण गात असताना केवळ मी आणि माझे गाणे एवढाच विचार मनात ठेवावा यश निश्चित मिळते. गायनातून स्वतःला आनंद मिळतो आणि इतरांना आनंद देता येतो.
संयोजक सनी निम्हण यांनी प्रास्ताविक केले. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही स्पर्धा निरंतर चालू राहिल असे त्यांनी आश्वासन दिले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, आमित मुरकुटे यांनी स्वागत, उमेश वाघ यांनी आभार प्रदर्शन, मेधा चांदवडकर आणि जितेंद्र भुरूक यांनी परिक्षण केले. माजी नगरसेविका स्वाती निम्हण यांच्या हस्ते आजच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. संजय माझिरे, प्रमोद कांबळे, रमेश भंडारी, किरण पाटील, संजय तारडे, गणेश शिंदे यांनी संयोजन केले.
आयडॉल स्पर्धेचे यंदाचे विसावे वर्ष आहे. या वर्षी 816 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. चार वर्षाच्या मुलीपासून 80 वर्षांच्या पद्मजा कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Shakti Zunzar. To Get Updates on Mobile, Download the
Shakti Zunzar Mobile App for Android.
शक्ती झुंजार आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी
Telegram ,
आम्हाला जॉईन करा तसेच, आमच्याआजच Subscribe करा.