संजय राऊतांना अखेर ईडीकडून अटक…

संजय राऊतांना अखेर ईडीकडून अटक…

मुंबई,दि.०१:-  खासदार संजय राऊत यांना ईडीने  अटक केली आहे.काल सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चाललेल्या चौकशीत राऊत हे ईडीला सहकार्य करत नव्हते. यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी रविवारी सकाळी सात वाजताच दाखल झाले होते. त्यांनी सोबत पोलिसांचा आणलेला फौजफाटा पाहता राऊत यांना ताब्यात घेणार असल्याचे संकेत मिळत होते. मैत्री बंगल्यावर सकाळी सात ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. यानंतर राऊत यांना ईडीने बलार्ड एस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात नेले. तिथेही रात्री उशिरा पर्यंत चौकशी करण्यात आली. या चौकशीत राऊत सहकार्य करत नसल्याने त्यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.