राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलमधील आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थ्यांचे आनंदाश्रू पाहून पालकही सुखावले

राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलमधील आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थ्यांचे आनंदाश्रू पाहून पालकही सुखावले

पुणे,दि.१५ :-दोन वर्षे जीवघेण्या कोरोनाला आपण सर्व सामोरे गेलो. 'वर्ग बंद...ऑनलाईन शिक्षण घरातून ' हेही आपण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले.मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाले आहे.शाळाही सुरू झाल्या आहेत. एकप्रकारे आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र पर्यावरण... 'ऑक्सिजन' चे महत्व कोरोनाच्या काळात सर्वांना कळले.त्यामुळेच विद्यार्थी दशेपासूनच पर्यावरण रक्षणाचे महत्व अधोरेखित व्हावे.सर्वांनी त्यासाठी कटिबद्ध व्हावे. शिक्षणाशिवाय आयुष्य घडत नाही...हे सत्य कायम स्मरणात ठेवून ज्ञानाचा वटवृक्ष बहरावा. या उद्देशाने  पुणे महानगरपालिकेच्या शिवदर्शन येथील    राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे शाळेचा पहिला दिवस झाडाची रोपे देऊन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि कॅटबरी देऊन माजी उपमहापौर आबा बागुल आणि शिक्षक वृदांने  जंगी स्वागत केले. यावेळी  रॅम्बो सर्कशीचे तीन विदूषकही विद्यार्थ्यांच्या  स्वागतासाठी खास उपस्थित असून यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हसवून स्वागत केले. तसेच पर्यावरणाचा जागर म्हणून वृक्षांची रोपे देऊन विद्यार्थ्यांसमवेत आलेल्या पालकांचेही  स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे आनंदाश्रू पाहून पालकही सुखावले.  याप्रसंगी आबा बागुल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी गाणे, कवितांचे सादरीकरण करून कलाविष्कारही सादर करताना भविष्यात आपण कोण होणार हेही आवर्जून नमूद करून शाळेप्रती असलेले प्रेमही व्यक्त केले.

या प्रसंगी आबा बागुल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व ही मुले देशाचे भविष्य आहेत. देश महासत्ता होण्यासाठी या मुलांना आत्ताच दर्जेदार व मोफत शिक्षण महापालिकेच्या शाळेंसोबत खासगी शाळेत ही द्यावे अशी विनंती मा.मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना आबा बागुल यांनी केली.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी ताटे,सागर आरोळे , शब्बीर शेख,स्वप्नील जोगदंड,सर्जेराव रेपाळे, रुपेश निकाळजे, सुनील भोसले, समीर शिंदे, बाबालाल पोळके,धनंजय कांबळे ,इम्तियाज  तांबोळी, सुरज सोनवणे,इर्शाद शेख, महेश बानगुडे  आदी उपस्थित होते.    


विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट उपक्रमाचे पालकांकडून स्वागत


शालेय जीवनातच पालिका शाळांमधील  विद्यार्थ्यांमध्ये  परदेशातील उच्च शिक्षणाविषयी ध्येय निर्माण व्हावे, त्यांची उमेद वाढावी या हेतूने  काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून  इयत्ता सातवी ते दहावी मधील   ७०० विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्याच्या उपक्रमाचेही पालकांनी उत्स्फूर्त स्वागत करून आबा बागुल यांच्याप्रती आभारही  व्यक्त केले आहे.