Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

मुंबई : सांज दैनिक शक्ती झुंजार ई-पेपर –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या मातोश्री (Mother) यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बरं वाटत नसल्याने आज होणारा मनसे (MNS) कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत.

दोघांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असताना देखील त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona report positive) आल्याचे समोर आले आहे. पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर (Krishnakunj) सॅनिटायझेशन केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर घरीच क्वारंटाईन (home Quarantine) होऊन उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या मातोश्रींनी आज (शनिवार) सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. त्यानंतर त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री दोघांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरी देखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

Web Title : Raj Thackeray | MNS president Raj Thackeray and his mother infected with corona