पुण्यात वाढदिवस साजरा कारणातून टोळक्यान कडुन राडा दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड

पुण्यात वाढदिवस साजरा कारणातून टोळक्यान कडुन राडा दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड

पुणे,दि.१९ :- पुणे शहरातील उत्तमनगर परिसरातील भररस्त्यात टोळक्याकडून वाढदिवस साजरा करण्यात येत होता. किरकोळ कारणातून त्यांच्यात वाद झाल्याने टोळक्याने कोयते फिरवत परिसरातील दहशत करीत  दुचाकी आणि मोटारींची तोडफोड केली तसेच नागरिकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली.याप्रकरणी सचिन दिलीप राठोड (वय 24, रा. कोंढवे धावडे) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार शुभम संदीप ठाकूर (वय 18), सोन्या खाडे, अक्षय राठोड तसेच अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत रोहिम गणेश मौर्य (वय 20, रा. मोरे बिल्डिंग, कोपरे गाव) याने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी शुभम ठाकूर याचा कोंढवे धावडे परिसरातील शिवशक्ती चौकात वाढदिवस साजरा करण्यात येत होता. आरोपींचा रोहिम मौर्य याच्याशी वाद झाला होता. ठाकूरचा वाढदिवस सुरू असताना कोयते नाचवून परिसरात दहशत माजवण्यास सुरुवात केली. आरोपींनी नागरिकांना शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Shakti Zunzar. To Get Updates on Mobile, Download the Shakti Zunzar Mobile App for Android.


शक्ती झुंजार आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी Telegram , Whatsapp आणि Facebook आम्हाला जॉईन करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच  Subscribe करा.