जेष्ठ नागरिक संस्थेच्या एकेरी कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीमध्ये अटीतटीचे सामने.

जेष्ठ नागरिक संस्थेच्या एकेरी कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीमध्ये अटीतटीचे सामने.

पुणे,दि.२०:- क्रीडा प्रतिनिधी -जेष्ठ नागरिक संस्थेच्या एरंडवणे शाखेतर्फे घेण्यात येणाऱ्या कै. घनश्याम सहस्त्रबुद्धे स्मृती करंडक एकेरी कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतील अनेक अटीतटीचे कॅरम सामने कॅरम खेळाडूंना बघायला मिळाले.
पटवर्धन बाग परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानशेजारी असलेल्या विरंगुळा केंद्रात  ह्या कॅरम स्पर्धा चालू असून सकाळी दहा ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सामने चालू आहेत.
आज रविवार दिनांक २१ मे रोजी अंतिम फेरी असून दुपारी ४ ते ६ या वेळेत अंतिम फेरीचे सामने होतील व सामने संपताच लगेचच प्रथम आठ विजेत्यांना व  काही उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात येतील असे स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी यांनी सांगितले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील.

स्पर्धा यशस्वितेसाठी अजित गोखले,श्रीकांत पुराणिक,शिरीष जोशी,उर्मिला शेजवळकर,माधव तिळगुळकर,अभय अतकेकर, सतीश सहस्त्रबुद्धे,जयंत मुळ्ये,प्रयत्न करीत आहेत.

उपांत्य फेरीतील व सहाव्या फेरीअखेरचे निकाल मुख्य पंच विलास सहस्त्रबुद्धे यांनी घोषित केले ते निकाल पुढीलप्रमाणे -
सुनील वाघ विजयी विरुद्ध बाळकृष्ण लोहोकरे २१-१८,१२-२३,२५-३,
राजाभाऊ ठाकूर विजयी विरुद्ध प्रदीप जाधव २३-१५,२१-१४,
सुधाकर चव्हाण विजयी विरुद्ध भूषण सिंग भोला २४-१,२५-४,
शेख नूर मोहम्मद विजयी विरुद्ध धनंजय लाटकर २५-५,१९-१५,२५-११