जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

पुणे,दि.२१:-पुणे शहरातील काही पोलिस ठाण्य हद्दीतील जुगार अड्डा सह अवैध धंदे पुणे शहरातील  खुलेआम पाहण्यास मिळत आहे तसेच लाॅटरीच्या नावाखाली सोरट, तसेच मटका,व तिकडम, विडिओ गेम,वर जुगार घेण्यात येत आहे तर काल सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा मध्ये उघड पाहण्यास मिळत आहे गुरुवार पेठेतील फुलवाला चौकाजवळील गौरी आळीत  जुगार अड्ड्यावर  गुन्हे शाखेच्या  सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला.
गौरी आळीतील पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मोटारसायकलवर बसून मटका जुगार घेणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.
त्यात खेळणारे ८, खेळविणारे ६  आरोपी ४ आणि पळून गेलेले ५ अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून ४ मोटारसायकलींसह एकूण २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला आहे. 
जुगार अड्डा मालक अमोल बाळासाहेब आंदेकर  (वय ४५, रा. गुरुवार पेठ),
जुगार अड्डा मालक मनोज ढावरे  (रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती), शकील शेख (रा. मोमीनपूरा),
रवींद्र रामभाऊ पवार (वय ५५, रा. रविवार पेठ) हे जुगार अड्डा मालक आहेत.
पत्र्याच्या शेडमध्ये जुगार घेणारे रायटर्स रिचर्ड अँथनी डिसुझा (वय ४३, रा. गुरुवार पेठ), उमेश नानाजी चौधरी (वय ४७, रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ) मेन बाजार मटका जुगार घेणारे/रायटर्स/मॅनेजर्स - राजेश मधुकर शेळके (वय ४२, मटका रायटर, रा. लक्ष्मीनगर, येरवडा),
शंतनु विजय पंडित (वय ३१, रा.१३४३, सदाशिव पेठ), गजानन राम महाडीक (वय ३०़ रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ), परशुराम भिकाजी कांबळे (वय ५१, रा.११०८ नाना पेठ), पैशांवर मेन बाजार मटका जुगार खेळणारे - हर्षल सुनिल चित्ते (वय ३२, रा. रविवार पेठ),
संजय गणपत रेणुसे (वय ५०, रा. गुरुवार पेठ), संजय सिताराम मेमाणे (वय ५१, रा. रविवार पेठ), तन्वीर अमीर शेख (वय ३४, रा. भवानी पेठ),
नजीर हुसेन मोमीन (वय ६५, रा. शुक्रवार पेठ), हुसेन जाफर कोटालिया (वय ३२, रा. घोरपडी पेठ),
सुनिल चंद्रकांत पारखे (वय ४३, रा. शुक्रवार पेठ), महमंद फयूम जमीर अहमद अत्तार (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोथरुड) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

गुरुवार पेठेतील गौरी आळीतील फुलवाला चौकाजवळ सोफा वाला बिल्डिंगच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व बाहेर मोटारसायकलवर बसून मटका जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली.
त्यानुसार, तीन परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस पथकाने सोमवारी रात्री साडेआठ वाजता येथे छापा घातला.
त्यावेळी ५ जण पळून गेले. तेथे असणार्‍या १४ जणांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून ८ हजार ९२० रुपये रोख, ६० हजार ५०० रुपयांचे १३ मोबाईल, जुगाराचे साहित्य,
४ मोटारसायकल असा २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे  उपायुक्त श्रीनिवास घाडगे 
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर (PSI 
पोलीस हवालदार मोहिते, शिंदे, इरफान पठाण, कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.