पुणे शहर पोलीस बालस्नेही कक्ष उद्घाटन समारंभ संपन्न

पुणे शहर पोलीस बालस्नेही कक्ष उद्घाटन समारंभ संपन्न

पुणे दि १३ :- पुणे शहर पोलीस  बालस्नेही कक्ष उद्घाटन समारंभ आज दि .१२  रोजी पुणे पोलीस आयुक्त व कैलास सत्यार्थी फाऊंडेशन व ज्ञानशक्ती विकासवाहिनी  यांचे अंतर्गत बालकांकरीता बालस्नेही पोलीस कक्ष  स्थापन करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाची आज पुणे शहर पोलीस आयुक्त , अमिताभ गुप्ता यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.व बालस्नेही कक्षाची संकल्पना ही बाल हक्क संरक्षण कायदा २०१५ तसेच कैलास सत्यार्थी फाऊंडेशन व ज्ञानशक्ती विकासवाहिनी यांच्या सहयोगाने बालकांच्या समुपदेशन कक्षाचे नूतनीकरण करुन ' बालस्नेही पोलीस कक्ष ' तयार करण्यात आलेला आहे . तसेच पोलीस स्टेशन स्तरावर विधीसंघर्षग्रस्त बालक किंवा पिडीत बालक आले नंतर पुढील कायदेशीर कारवाई करुन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय तसेच.बालन्याय मंडळ , येरवडा , पुणे किंवा. बालकल्याण समिती , येरवडा , पुणे यांचे समक्ष हजर केले जाते . पिडीत ( काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालके ) बालकांना बाल कल्याण समिती समक्ष हजर केले नंतर त्यांचे आदेशान्वये संबंधित बालकांना बालगृहात ठेवले जाते . या सर्व प्रक्रियेमध्ये संबंधित बालकांना पोलीस स्टेशनकडुन घेवून संबंधित यंत्रणेकडे जाणेसाठी वाहन उपलब्ध होत नसलेने पुढील कामकाजास उशिर होतो . त्याचप्रमाणे बाल भिक्षेकरी कारवाई करण्यासाठी व ताब्यात घेतलेले बाल भिक्षेकरींना बाल कल्याण समिती , येरवडा , पुणे येथे घेऊन जाण्यासाठी चारचाकी वाहनाची आवश्यकता असते . यावर उपाययोजना म्हणून.पोलीस आयुक्त , पुणे शहर यांच्या मान्यतेने व होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती . कॅरोलीन अॅडॉर यांच्या सहकार्याने निडर प्रकल्प अंतर्गत टास्क फोर्स उपक्रमात एक चारचाकी वाहन ( क्रुझर ) , ड्रायव्हर व त्यांचेशी संपर्क करण्यासाठी संपर्क अधिकारी असून , सदर वाहतूक सेवा पुणे शहर पोलीस दलासाठी विना शुल्क २४ तास उपलब्ध करुन देवुन , सदर वाहनाची देखभाल व नियंत्रण संस्थेमार्फत केली जाणार आहे . सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्त  अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त. संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त , गुन्हे  रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे -२ डॉ . नारायण शिरगावकर , सहा पोलीस आयुक्त , गुन्हे २ , गजानन टोम्पे , होप फॉर चिल्ड्रेन या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती . कॅरोलीन अॅडवा , डी . वॉल्टर , व्यवस्थापक शकील शेख , टास्कफोर्स बालस्नेही कृती दल चे समन्वयक , वसीम शेख , कैलास सत्यार्थी फाऊंडेशनच्या व्यवस्थापिका हेमंतीकुमार , कैलास सत्यार्थी फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती दिक्षा यादव व ज्ञानशक्ती विकासवाहिनीचे अध्यक्ष डी . के . वळसेपाटील व कार्यकारी संचालिका श्रीमती गार्गी काळे पाटील , सुनिल जोशी , उत्कृर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था , ज्ञानेश्वर हनवते , बाल कल्याण समिती , पुणे -२ चे आनंद शिंदे , बजाज कंपनीचे सी . एस . आर. अन्नमित्रा दासगुप्ता , लोकप्रबोधन विविध कलागुणदर्शन , उस्माबादाचे धनाजी धोतरकर , सरस्वती सेवाभावी संस्थाचे  रमेश कुटे , बजाज कंपनीचे सी . एस . आर . अन्नमित्रा दासगुप्ता आशामंत फाऊंडेशन दारफळ , सोलापुरचे अध्यक्ष  हनुमंत बारबोले व इतर मान्यवर तसेच पोलीस निरीक्षक  सुनिल थोपटे , भरोसा सेल , गुन्हेशाखा , पुणे शहर , सहा . पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना कटके , सहा पोलीस निरीक्षक , सुजाता शानमें , महिला कक्ष , भरोसा सेल गुन्हेशाखा , सहा . पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता बोडखे , ज्येष्ठ नागरीक कक्ष , भरोसा सेल , पुणे शहर कार्यक्रमास उपस्थित होते .