पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस क्रिडा स्पर्धा 2022 बक्षिस वितरण व समारोप समारंभ संपन्न

पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस क्रिडा स्पर्धा 2022 बक्षिस वितरण व समारोप समारंभ संपन्न

पुणे,दि.२७:- पुणे शहरांतील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे ३८ वी पुणे शहर व पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रिय क्रिडा स्पर्धा -२०२२ पुणे शहर व पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचेकडून दि .२४ / ०८ / २०२२ रोजी ते दि . २६/०८/२०२२ रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय , पुणे शहर येथे आयोजीत करण्यात आली होती . या स्पर्धेत पुर्व पश्चिम विभाग , मुख्यालय , इतर शाखा व पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय इत्यादी चार संघांनी भाग घेतला होता . सदर पोलीस क्रिडा स्पर्धेचा बक्षिस वितरण व समारोप समारंभ सोहळा दि . २६/०८/२०२२ रोजी सायंकाळी ५.३० मिनिटे . पोलीस मुख्यालय , शिवाजीनगर , पुणे येथे  प्रविण कुमार  IRS  प्रमुख मुख्य आयुक्त आयकर विभाग , पुणे यांचे शुभहस्ते पार पडला . सदरचा कार्यक्रम हा पुणे शहर पोलीस आयुक्त  अमिताभ गुप्ता , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त , अंकुश शिंदे ,  अपर पोलीस आयुक्त प्रशासन , डॉ . जालींदर सुपेकर , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे ,  रामनाथ पोकळे ,  अपर पोलीस आयुक्त , पुर्व विभाग नामदेव चव्हाण ,  अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , राजेंद्र डहाळे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळीय विभाग , सहा . पोलीस आयुक्त तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थित पार पडला . जत पोलीस क्रिडा स्पर्धेच्या सांगता समारंभा पुर्वी पुरुष व महिलां मध्ये 2/3 धावण्याच्या स्पर्धा तसेच पोलीस अधिकारी आणि निमंत्रिक यांचेमध्ये रस्सीखेच स्पर्धा केल्या होत्या . त्यामध्ये १०० मिटर धावणे ( पुरुष ) गट या स्पर्धेत प्रथम क्रमांक महेश आवाळे , व्दितीय क्रमांक- गोविंद कोळेकर त्याचप्रमाणे १०० मिटर धावणे ( महिला ) या स्पर्धेत प्रथम क्रमांक- स्नेहा धुरी , व्दितीय क्रमांक सुरेखा ठाकरे हे विजयी झाले . सांघिक खेळामध्ये पुरुष संघात हॉकी मुख्यालय व इतर शाखा , फुटबॉल मुख्यालय व इतर शाखा , हॅण्डबॉल - पिंपरी चिंचवड , बास्केट बॉल पूर्व प्रादेशिक विभाग , हॉलीबॉल मुख्यालय व इतर शाखा , कबड्डी पिंपरी - चिंचवड , खो - खो मुख्यालय व इतर शाखा , महिला संघात बास्केट बॉल मुख्यालय व इतर शाखा , हॉलीबॉल मुख्यालय व इतर शाखा , कबड्डी पिंपरी - चिंचवड या संघानी प्रथम स्थान पटकावले . तसेच पोलीस अधिकारी व निमंत्रिक यांचेमध्ये रस्सीखेच मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी विजयी झाले . सदर सांगता समारंभापुर्वी झालेल्या स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे श्री प्रविण कुमार ( IRS ) प्रमुख मुख्य आयुक्त , आयकर विभाग , पुणे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले . यावर्षीच्या स्पर्धेमध्ये पुणे शहर आयुक्तालया अंतर्गत पुर्व प्रादेशिक विभाग , पश्चिम प्रादेशिक विभाग मुख्यालय इतर शाखा व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय असे एकुण चार संघातुन २४१ खेळाडुंनी सहभाग घेतला होता . सर्व साधारण विजेतेपदाची सन्मानाची ढाल मुख्यालय व इतर शाखा यांनी पटकावुन त्या संघास प्रदान करण्यात आली . या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स मध्ये विजयी ठरलेली महिला पोलीस अंमलदार , स्नेहा धुरी , गुन्हे शाखा , पुणे शहर ही सर्वोत्तम महिला खेळाडू ठरली . त्याचप्रमाणे पोलीस अंगलदार , अली शेख , पिंपरी - चिंचवड आयुक्तालय हा सर्वोत्तम अॅथलेटिक्स पुरुष खेळाडू ठरला आहे . श्री प्रविण कुमार ( IRS ) प्रमुख मुख्य आयुक्त आयकर विभाग , पुणे यांनी " पुण्याला शिस्त लावण्यात पुणे पोलीसांचे योगदान महत्वाचे आहे , पोलीसांचे फिटनेससाठी अशा स्पर्धा महत्वाचे असतात , पोलीस स्पर्धासाठी अतिथी म्हणुन निमंत्रित करणे हा माझा सन्मान आहे " असे मनोगत व्यक्त करून , विजयी खेळांडुं व संघाचे चांगल्या कामगिरीबाबत आपले मनोगत व्यक्त केले . तसेच मा . पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , श्री अंकुश शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले . या कार्यक्रमास सेवानिवृत्त तसेच पोलीस दलातील सर्व अधिकरी व अंमलदार तसेच प्रतिष्ठीत मान्यवर नागरीक त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांचे प्रतिनीधी हजर होते . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा पो . निरी विक्रम मिसाळ , पुणे शहर , म.पो.उप निरी सुप्रिया पंढरकर व एकता कपुर ( अँकर ) यांनी केले आहे . सदर कार्यक्रमानंतर विजयी खेळाडू व मान्यवरांसाठी संगित रजनी ( ऑर्केस्ट्रा ) व बडाखाना याचे आयोजन करण्यात आले होते .