स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन

पुणे दि.९- उपविभागीय अधिकारी हवेली अधिनस्त येणाऱ्या कार्यालयांच्या  सहकार्याने  बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता मामलेदार कचेरी येथून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

आद्य क्रांतीवीर हुतात्मा उमाजी नाईक स्मारकाला वंदन करून  प्रभात फेरीचा शुभारंभ होणार आहे. उमाजी नाईक स्मारक, राष्ट्र भूषण  चौक,  घोरपडे पेठ पोलीस चौकी, दलाल पान शॉप, महात्मा फुले स्मारक, लोहिया नगर, सोनावणे हॉस्पिटलमार्गे मल्लिका पासून पुढे जुना मोटर स्टँड, पद्मजी  पोलिस चौकी, क्वार्टर गेट, शांताई  हॉटेल, लाल देवळ, जिल्हा परिषद नवीन, ब्लू नाईल हॉटेल मार्गे विधान भवन येथे प्रभातफेरीचा समारोप होईल.

प्रभातफेरीत सहभागी होण्यासाठी  नागरिकांनी उमाजी नाईक स्मारक खडक माळ आळी शुक्रवार पेठ येथे उपस्थित राहावे.  हा कार्यक्रम स्वातंत्र्य संग्रामात बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केला आहे.
स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रभातफेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केले आहे.