अट्टल चोरट्यांना कर्जत पोलिसांचा दणका, १० महिलांसह २० चोरटे गजाआड

अट्टल चोरट्यांना कर्जत पोलिसांचा दणका, १० महिलांसह  २० चोरटे गजाआड

कर्जत,दि.२७:-  कर्जतच्या भव्य रथयात्रेचे...एकीकडे हजारो नागरिकांच्या गर्दीचा लोट यात्रेचा आनंद घेत होता...मनोरंजन नगरीतही तेवढीच लक्षणीय गर्दी...सद्गुरू गोदड महाराजांच्या मंदिराकडे भाविक दर्शनासाठी गर्दी करत होते...गोदड महाराजांच्या विश्वासावरच सगळं नियोजन सुरू होते परंतु... दुसरीकडे मात्र कर्जत पोलीस आपल्या डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिश्रम घेत होते. अंगावर पाऊस झेलत कंबरेवर हात ठेवून अगदी विठ्ठलाच्या रूपाने कर्जत पोलीस चोरट्यांना विलक्षण नजरेने हेरून गर्दीतून बाहेर काढत होते. पोलीसांची नजर पडताच चोरटे आणखी गर्दीत घुसत होते.मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातुन लावलेल्या ट्रॅपमधून अगदी सहा तासांमध्ये एक नव्हे तर तब्बल १८ सराईत चोरटे कर्जत पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कर्जत पोलीसांच्या या सतर्कतेचे अक्षरशः कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.
        गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कर्जतची रथ यात्रा भरली नव्हती मात्र यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला.गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी,दागिने,रोकड,चोऱ्या करण्यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिल्ह्यातून, परगावाहून या यात्रेत सहभागी झाले होते.मात्र 'नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता यंदाची रथयात्रा उत्साहात पार पाडायची' असा संकल्प करून कर्जत पोलीस मैदानात उतरले होते. कुठेही गोंधळ होऊ नये, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी उत्कृष्ट नियोजन कर्जत पोलिसांनी केले होते.कधी नव्हे ते यंदा रथयात्रेवर २९ सीसीटीव्ही कमेऱ्यांची प्रत्येक नागरिकावर करडी नजर होती.त्यामुळे टवाळखोरांना आणि गुन्हेगारांना मोठा चाप बसला.चोऱ्या करण्यासाठी विविध जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या या सराईत चोरट्यांवर अगोदरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार समजते आहे.या कारवाईत तब्बल १८ जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांची नावे पुढीलप्रमाणे:
१)आर्यन अमिताभ निमगावकर (रा.लाईटबोर्डाचे पाठीमागे कर्जत),
२)आनंद रविंद्र पवार उर्फ टकशा (रा.गोरोबा टाकी जामखेड), 
३)काजल कलाकार चव्हाण उर्फ काजल अविनाश काळे (रा.वाकी ता.आष्टी), 
४)निर्मला हनुमंत जाधव, 
५)हनुमंत मुड्या जाधव (दोघेही रा.लेखानगर नाशिक), 
६)अमोल जालिंदर काळे (रा.अरणगाव मूळ गोरोबाटाकी जामखेड), 
७)किरण रावसाहेब काळे (रा.मिलिंदनगर जामखेड), 
८)सागर ताराचंद भागडे (रा.गोरोबा टाकी जामखेड), 
९)संतोष शंकर चव्हाण (रा.उरुळीकांचन), 
१०)राहुल रमेश जाधव(दोघेही रा.यशवंतनगर अकलूज), 
११)गोवर्धन सुरेश काळे (रा.सदाफुलेवस्ती जामखेड), 
१२)कमल बबन फुलवरे, 
१३)मंगल संभाजी शिंदे, 
१४)शिला पप्पू फुलवरे (तिघेही रा.गेवराई बीड), 
१५)रोहिणी सुनील पिटेकर,
१६)स्वाती संतोष पिटेकर,  
१७)राणी शरद पिटेकर, तिन्ही राहणार म्हाळंगी तालुका कर्जत,
१८)माया प्रवीण गायकवाड,
१९)सोनी जगत राकडे, 
२०) इंदू आनंदा गायकवाड तिन्ही राहणार अशोकनगर तालुका जिल्हा वर्धा.वरील आरोपींवर जबरी चोरी, चोरी, चोरीचा प्रयत्न, संशयास्पद परिस्थितीत फिरणे अशा प्रकारचे गुन्हे कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. यातील पाच आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आले आहे. १२ अटक आरोपींवर अहमदनगर पुणे सोलापूर वर्धा येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 
चोऱ्या होण्याच्या अगोदरच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांचे टीमने चोरटे जेरबंद केल्यामुळे चोऱ्या झाल्या नाहीत याबद्दल समस्त कर्जतकरांनी आणि भाविकांनी कर्जत पोलिसांचे कौतुक करून आभार मानले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे पोलीस जवान श्याम जाधव अंकुश ढवळे पांडुरंग भांडवलकर सुनील खैरे गोवर्धन कदम शकील बेग ईश्वर नरोटे मनोज लातूरकर कोमल गोफणे राणी व्यवहारे बळीराम काकडे जयश्री गायकवाड भरत डगोरे सलीम शेख उद्धव दिंडे प्रवीण अंधारे शाहुराज तिकटे यांनी केली..