पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव पिंपरी चिंचवड पोलिसांनी उधळला

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव पिंपरी चिंचवड पोलिसांनी उधळला

पिंपरी चिंचवड,दि.१७ :- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या धडाकेबाज कार्यवाईमुळे निगडीमधील पेट्रोल पंपावर दरोड्याचा तयारी असल्याचं आरोपीचा  डाव पोलिसांनी उधळून लावला. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत दाद्या गवळी टोळीच्या म्होरक्यासह सराईत गुन्हेगारांच्याटोळीस धारदार शस्त्रसंह अटक करण्यात आली.याप्रकारणी दाद्या गवळी टोळीचा म्होरक्या आनंद उर्फ दाद्या राजू गवळी, (वय 20 वर्षे, रा. निगडी), दीपक अरुण चांदणे, (वय 22 वर्षे, रा. ओटा स्कीम, निगडी),सागर रामदास जाधव, (वय 21, रा. निगडी) व त्यांचे 2 रेकॉर्डवरील अल्पवयीन साथीदार या आरोपींच्या विरोधात पोलीस हावलदार जयवंत राऊत यांच्या फिर्यादीवरून निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे एक तलवार, दोन कोयते, लोखंडी रॉड, 2 मिरची पावडर पूड, दोर, मोबाईल, रक्कम असे साहीत्य मिळाले आहे. अधिक तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गिरीगोसावी हे करीत आहेत . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ . संजय · , शिंदे पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ . काकासाहेब डोळे सहायक पोलीस आयुक्त डॉ . प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट २ चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड , पोलीस अंमलदार केराप्पा माने , दिपक खरात , शिवानंद स्वामी , दिलीप चौधरी , प्रमोद वेताळ , उषा दळे , जयवंत राऊत , देवा राऊत , विपुल जाधव , नामदेव कापसे , आतिष कुडके , सागर अवसरे , अजित सानप , शिवाजी मुंढे , उध्दव खेडकर , संदेश देशमुख यांचे पथकाने केली आहे .