क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळ्यात

क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड,दि.०४:-  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या  गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एकाला अटक केली आहे आरोपीकडून 1 लाख 14 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने ही कारवाई मोहननगर येथे मंगळवारी रात्री 10.20 च्या सुमारास केली.विनायक कृष्णा शेलार (वय-50 रा. शेलार चाळ, मोहननगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना मोहननगर येथे एक व्यक्ती भारत- वेस्ट इंडीज टी-20 सामन्यावर  सट्टा घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना मिळाली. पथकाने रात्री 10.20 च्या सुमारास मोहननगर येथे सापळा रचून आरोपी विनायक शेलार याला ताब्यात घेतले. आरोपी त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये या अ‍ॅपद्वारे बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून 1 लाख 14 हजार 540 रुपयांचे 6 मोबाईल जप्त केले.ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे,
पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे,
मनिषा हाबळे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे,
पोलीस अंमलदार विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, गणेश सावंत, गणेश कोकणे, विनोद वीर, प्रविण माने, उषा दळे, नम्रता सकट व आशा लोमटे यांच्या पथकाने केली.