सांज दैनिक शक्ती झुंजारचा २५ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

सांज दैनिक शक्ती झुंजारचा २५ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे,दि.०४:- गेली दोन दशकांहून अधिक काळ जनमाणसांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी महत्वपूर्ण भुमिका निभावणाऱ्या सांज दैनिक शक्ती झुंजारचा २५ वा वर्धापन दिन ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे मा. आमदार विनायक निम्हण व इतर 
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सांज दैनिक शक्ती झुंजारचा २५ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सोहळ्यात करोना काळात पुणे, पिंपरी चिंचवड,तसेच पुणे ग्रामीण परिसरात नागरिकांना मदत केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
लोकशाही चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिलं जातं गेली २५ वर्षाच्या कार्यकाळात कायमच लोकहिताची, जनसामान्यांच्या हक्कासाठी सांज दैनिक शक्ती झुंजार ची भुमिका राहिली आहे यापुढे वेळोवेळी जनसामान्यांचा हक्काचा आवाज म्हणून कार्यरत राहणे हाच दृष्टिकोन मनात ठेवून पुढील वाटचाल सुरू राहील अशी भावना सांज दैनिक शक्ती झुंजारचे मुख्य संपादक संतोष राम काळे यांनी व्यक्त केली.