मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drug Case) एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) हे चांगलेच वादात सापडल्याचे पहायला मिळत आहे. एनसीबीच्या पंचाने समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला (Birth certificate) ट्विट केला असून ‘समीर दाऊद वानखेडे इथपासून हा फर्जीवाड़ा सुरु’ झाल्याचे म्हटलं. त्यानंतर आता समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांनी तात्काळ खुलासा केला आहे.
I belong to multi religious and secular family. My father is a Hindu and my mother was a Muslim. Publishing of my personal documents on Twitter is defamatory and invasion of my family privacy. Pained by slanderous attacks by Maharashtra Minister Nawab Malik: Sameer Wankhede, NCB pic.twitter.com/L0VZKHIZ8p
— ANI (@ANI) October 25, 2021
नवाब मलिकांच्या आरोपांवर खुलासा करताना समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) म्हणाले, नवाब मलिक हे माझ्या खासगी गोष्टी
जाहीरपणे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मलिक माझ्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे
(Dnyandev Kacharuji Wankhede) हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) निवृत्त अधिकारी असून ते हिंदू
(Hindu)आहेत. तर आई झाहिदा ही मुस्लिम (Muslim) आहे. मी हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही धर्मासोबत संबंधित असून मी स्वतंत्र विचाराचा आहे, असा
खुलासा त्यांनी केला आहे.
मलिकांचा लग्नाचा दावा खरा
समीर वानखेडे यांचे यापूर्वी लग्न झाले असून त्यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर देखील वानखेडे यांनी खुलासा केला आहे. माझं पहिलं लग्न डॉ. शबाना कुरेशी (Dr. Shabana Qureshi) यांच्यासोबत 2006 मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत झालं होतं. त्यानंतर 2017 मध्ये मी तिच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर क्रांती रेडेकरसोबत (Kranti Redekar) विवाह केला, अशी माहिती वानखेडे यांनी पत्रातून दिली.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
मलिकांना नोटीस देणार
नवाब मलिक यांनी ‘समीर दाऊद वानखेडे यहां से शुरू हुआ फर्जीवाडा’ असं ट्विट करत वानखेडे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली असून त्यांना मानसिक त्रास झाला आहे. त्यासाठी मंत्री नवाब मलिक यांना नोटीस (Notice) बजावणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
Web Title: NCB Officer Sameer Wankhede | Sameer Wankhede’s revelation after the allegation of NCP Minister Nawab Malik, said – ‘My father is a Hindu, but my mother