MP Raksha Khadse | शिवसेना नेत्याची रक्षा खडसेंवर टीका; म्हणाले – ‘खासदारालाच अर्ज भरता येत नसेल तर

MP Raksha Khadse | शिवसेना नेत्याची रक्षा खडसेंवर टीका; म्हणाले – ‘खासदारालाच अर्ज भरता येत नसेल तर

जळगाव :सरकारसत्ता ऑनलाइन –  जिल्हा बँक निवडणुकीत (jalgaon district central cooperative bank) भाजपच्या (BJP) एका खासदाराचा आणि एका आमदाराचा अर्ज बाद झाला आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी थेट भाजप खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांच्यावर निशाणा साधत खासदारालाच (MP Raksha Khadse) अर्ज भरता येत नसेल तर तो काय गुलाबराव पाटलाने केला काय? अशा शब्दांत असा टोला लगावला आहे.

रविवारी गुलाबराव पाटील (Shivsena Minister Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत शहरात आयोजित मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप सोहळा पार पडला.
त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद (MP Raksha Khadse) झालं आणि त्याने असे आरोप केले तर ठीक आहे.
त्याला कळत नसेल आपण समजून घेऊ पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही त्यांनी केला.
अर्ज तुम्ही चुकीचा भरायचा, तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बाद करायचा, यात माझा रोल नाही.
(MP Raksha Khadse) निवडणूक निर्णय अधिकारी काय मी नियुक्त केलेत का? त्यामुळे अर्ज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाद केले.
असे आरोप भाजपने करावे, हे चुकीचे आहे. अर्ज भरणाऱ्याला ते कळलं पाहिजे. भाजप नेते अपील करू शकतात.
आरोप केले पाहिजेत पण त्यामध्ये काही तरी तथ्य असले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.

सर्व पक्षीय नेत्यांनी यापूर्वीही जिल्हा बँकेची निवडणूक लढवली होती. मी पण यावेळी पालकमंत्री म्हणून त्यासाठी प्रयत्न केले. पण शेवटी तसे झाले नाही.
मला आडमुठेपणा करायचा असता तर मी पहिल्यांदाच म्हंटल असत की मला निवडणूक लढवायची आहे.
माझेही बिनविरोधचेच प्रयत्न होते. जिथे जिल्ह्याचे हीत आहे, तिथे सर्वांनी एकत्र रहावे, अशी माझी कायम भूमिका आहे असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Web Title : MP Raksha Khadse | mp cant fill simple application what to call it gulabrao patil