
पुणे,दि.२५:- शासनाच्या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ डि-अॅडिक्शन व वुमन सेफ्टी च्या अनुषंगाने समाजात जनजागृती करण्यासाठी दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे शहर पोलिसांकडून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पुनीत बालन ग्रुप व पंचशील ग्रुप यांच्या सहकार्याने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मॅरेथॉनचे आयोजन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. व अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने पुणे पोलीस व नागरिकांकरीता ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लब, पुणे यांच्याकडून ६ ऑगस्ट २०२३ रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडे पाच वाजता पुण्यातील वेस्टीन हॉटेल, एबीसी रोड कोरेगाव पार्क येथून सुरु होऊन हडपसर मगरपट्टा सिटी येथून पुन्हा वेस्टील हॉटेल येथे येऊन समाप्त होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी https://www.townscript.com/e/pune-police-run-10k-243042 या लिंकवरून नाव नोंदणी करायची आहे. नाव नोंदणी मोफत असून सहभागी स्पर्धकाला मोफत टी-शर्ट, मेडेल, नाष्टा दिला जाणार आहे.
रन फॉर डि-अॅडिक्शन अँड रन फॉर वुमन सेफ्टी मॅरेथॉनमध्ये पोलीस
व नागरिक असे स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
त्यामुळे ज्या स्पर्धकांना यामध्ये भाग घ्यायचा आहे.
अशांनी तात्काळ नाव नोंदणी करावी. सुरक्षित पुणे
व तंदरुस्त पुणेकरांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे.