पिंपरी चिंचवड येथील पत्रकार युनूस खतीब यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान.

पिंपरी चिंचवड येथील पत्रकार युनूस खतीब यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान.

पिंपरी चिंचवड,दि.,२१. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :- पिंपरी चिंचवड येथील पत्रकार युनूस खतीब यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

युनूस खतीब यांना माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते, डॉ कुमार सप्तर्षी यांच्या यांच्या उपस्थितीत रविवारी आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या  सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील  कार्यक्रमात करण्यात  आला .'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सोहळा २० ऑगस्ट २०२३ रोजी , दुपारी १२ वाजता,आझम कॅम्पस येथे  झाला.'प्रेस मीडिया लाईव्ह' वृत्त संस्थेचे प्रमुख  मेहबूब सर्जेखान यांनी स्वागत केले.