जिओ ग्राहकांसाठी आणणार जिओ बूक लॅपटॉप,

जिओ ग्राहकांसाठी आणणार जिओ बूक लॅपटॉप,

महाराष्ट्रात लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.लॅपटॉप कुठेही नेता येत असल्याने त्यावरून काम करणे सोयीचे ठरते. मात्र त्यातील प्रगत तंत्रज्ञानामुळे त्याची किंमत अधिक असते.त्यामुळे अनेकांना तो परवडत नाही. मात्र, एक आनंदाची बातमी रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी एक स्वस्त लॅपटॉप आणणार आहे. या लॅपटॉपची किंमत १५ हजार असणार आहे, अशी माहिती सुत्रांनी रॉयटर्सला दिली आहे.

रिलायन्स जिओ लवकरच एक स्वस्त ४ जी लॅपटॉप भारतात लाँच करेल. या लॅपटॉपची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्यात ४ जी सीम असेल. कंपनी स्वस्त जिओ फोनच्या धर्तीवर हा लॅपटॉप ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे. या लॅपटॉपचे नाव जिओ बूक असेल.लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्स जिओने क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांशी भागिदारी केली आहे. क्वालकॉम कंपनी जिओच्या लॅपटॉपसाठी आर्म लिमिटेडच्या तंत्रज्ञानाने निर्मित चिपसेट देणार आहे, तर लॅपटॉपमधील काही अ‍ॅप्स हे मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने चालतील.