Jayant Patil | समीर वानखेडेवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले

Jayant Patil | समीर वानखेडेवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Jayant Patil | आर्यन खान अटक (Aryan Khan arrest case) प्रकरणानंतर अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर दररोज अनेक आरोप करत आहेत. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाटील यांच्या विधानानंतर राज्यात चर्चा रंगल्या आहेत. त्यावेळी जयंत पाटील हे ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने (NCB) टाकलेले अनेक छापे आणि समीर वानखेडे यांच्याबद्दल नवाब मलिक यांनी पुराव्यासह काही गोष्टी समोर आणल्या आहेत. हे एकंदर प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील, असे संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांच्या या विधानावरुन या प्रकरणात आता राज्य सरकार (Maharashtra Government) लक्ष घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढे ते म्हणाले, प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यानं एनसीबी व समीर वानखेडे यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील चित्रपट उद्योगाला आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. ED, CBI, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टिव्ह झालेली दिसते. एनसीबीच्या धाडींमध्ये भाजपचे कार्यकर्तेच संशयितांना पकडताना दिसत आहेत

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपकडून करून झाला आहे.
पण हे सरकार पडत नाही असं दिसल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आर्यन खान हे प्रकरण त्याचाच भाग आहे.
आर्यन खान प्रकरण बोगस असल्याचं मलिक यांनी पुराव्यासह उघड केलं आहे.
आज समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला त्यांनी प्रसिद्ध केला आहे.
त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचं दाखवून फायदा मिळवला असल्याचं दिसत आहे.
असंही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

Web Title :-Jayant Patil | ncp leader jayant patil on allegations against ncb officer sameer wankhede row