दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगार डेक्कन पोलिसांच्या जाळ्यात

दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगार डेक्कन पोलिसांच्या जाळ्यात

पुणे,दि.,२३. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :- दरोड्याच्या तयारीत  असलेल्या सराईत गुन्हेगार  डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई  सोमवारी (दि.२१) मध्ये रात्री लॉ कॉलेज रस्त्यावरील एका बिल्डींगच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत केली.जसपालसिंग जपानसिंग जुन्नी (वय-२०, रा.भारत नगर, पिंपरी चिंचवड), कुलदीपसिंग युवराजसिंग जुन्नी (वय-२०, पाटील इस्टेट, शिवाजीनगर), नसीबसिंग रणजितसिंग दुधानी (वय-१८, न्यू बुधवार पेठ, सोलापूर), प्रसादसिंग जलसिंग भोंड (वय-१९ रा. भरतनगर, पिंपरी चिंचवड), गौरव शंकर राठोड (वय-१९, गोल्डन चौक, चाकण) यांना अटक  केली आहे.व अरुणसिंग चंदाशिंग भोंड (रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) हा पळून गेला आहे.
डेक्कन पोलीस ठाण्यातील  तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांना गोपनीय माहिती मिळाली की, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका बिल्डिंगच्या शेजारी मोकळ्या जागेत काही जण लोखंडी कोयते व चारचाकी टेम्पे घेऊन एकत्र जमले आहेत.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याठिकाणी बसलेल्यांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. व परिसरात पाहणी केली असता एक चार चाकी टेम्पो उभा असल्याचे आढळून आले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत ते डेक्कन येथील इंडसइंड बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून कोयते, दोरी, ब्लेड, लोखंडी कटावणी, टेम्प जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करत आहेत.
ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार,
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील,
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल,
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस,
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, पोलीस अंमलदार चव्हाण, शिंदे,
निकाळजे, बोरसे, महिला पोलीस अंमलदार सुपेकर, गायकवाड, येळे, गोफणे, भांगले, तरंगे, तांबे, गायकवाड,
बागुले, बडगे, पाथरुट, काळे, जाधव यांच्या पथकाने केली.