अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर इंदापूर पोलीसांची कारवाई

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर इंदापूर पोलीसांची कारवाई

इंदापूर,दि.१५ :-इंदापूर परिसरामध्ये  पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी नाकाबंदी दरम्यान कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता.हा संशयित ट्रक ताब्यात घेऊन गाडीतील मालाची तपासणी केली असता गाडीमध्ये तंबाखु मिश्रीत गुटखा आढळुन आला. सदरच्या ट्रकसह गाडीतील माल इंदापूर पोलिसांनी जप्त केला.जप्त केलेल्या ट्रकमधील मालाची दोन पंचासमक्ष पाहणी केली. ट्रकमध्ये एकूण ५० बॉक्स गुटखा, किंमत २४ लाख ७५ हजार व व दहा चाकी ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला आहे. सदर ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध कलम ३२८ व इतर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,विभागीय पोलिस अधीकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस नाईक महेंद्र पवार, पोलीस नाईक सलमान खान,बापू नाईक,जगन्नाथ कळसाईत व मोहम्मद अली मडी ,पोलीस हवालदार अमोल खैरे व श्री बालगुडे, पोलीस शिपाई विशाल चौधर, लक्ष्मण सूर्यवंशी, अकबर शेख, पोलीस मित्र महादेव गोरवे,शुभम सोनवणे, हनुमंत मोटे, अनिल शेवाळे, भाऊ कांबळे यांनी केली.व पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत