दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डिजे व ढोल - ताशांचा पुण्यात कसून सराव

दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डिजे व ढोल - ताशांचा पुण्यात कसून सराव

पुणे,दि.२५:- पुण्यातील उत्सवांवरील निर्बंध उठवल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव व दही हंडी  जल्लोषात साजरा होणार आहे.या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा तसेच डिजे सध्या जोरदार सराव सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात काही परिसर ढोल-ताशांच्या आवाजाने दुमदुमून जात आहे. पथकांचा सराव बघणार्‍यांच्या गर्दीतही वाढ झाल्याचे ढोल-ताशा पथकांच्या वरिष्ठांच्या वतीने सांगण्यात आले.यंदा पथकांच्या संख्येसोबतच नवीन वादकांचीही संख्या वाढली आहे. यामुळे पथकात प्रवेश द्यायचा तरी कोणाला हा प्रश्न प्रत्येक ढोल-ताशा पथकांच्या वरिष्ठांना पडत आहे. नव्या वादकांना जास्त सरावाची गरज असते. जुन्या वादकांच्या वादनांत दोन वर्षांचा खंड पडल्यामुळे त्यांचादेखील जास्त सराव घेण्यावर पथकांकडून भर दिला जात आहे. नव्या वादकांना शिकवण्यासोबत जुन्या वादकांसोबत ताळमेळ बसण्यासाठी रोज जोरदार सराव सुरू असल्याचे ढोल-ताशा पथकांच्या प्रमुखांनी सांगितले.या पथकांचा सहभाग
आदिमाया ढोल-ताशा पथक, स्वराज्य ढाल-ताशा पथक, नूमवी वाद्यपथक, समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा व ढाल-तलवार पथक, धर्मयोद्धा प्रतिष्ठान, रुद्रांग वाद्यपथक, शिवांश पथक, शंभो ढोल-ताशा पथक, युवा वाद्य पथक, आरंभ ढोल-ताशा पथक, नादवरदहस्त ढोल-ताशा पथक आदींसह सुमारे पंधरा पथकांचा सराव दररोज संध्याकाळी पुणे शहर  सुरू असतो.
मुला व मुलींचा दररोज सराव सुरू आहे.  ढोल-ताशा वादकांचा सराव बघण्यासाठी सध्या पुण्यात काही ठिकाणी गर्दी होत आहे.