
पुणे,दि.२९:- पुणे शहरातील मार्केट यार्ड येथे एका रिक्षा मध्ये कल्याण मटका जुगार घेत असताना पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला. त्यात जुगार, घेणारे, खेळणारे, असे १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार ४० रुपये किंमतीचे मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोनि .राजेश पुराणिक यांनी गोपनीय बातमी मिळाली की एका रिक्षा मध्ये कल्याण मटका जुगार घेत आहे व पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोनि .राजेश पुराणिक यांनी गोपनीय बातमी मिळाली व पोलीस पथकाने गुरुवारी दुपारी ०३.३० वा. चे सुमारास छापा टाकून कल्याण मटका जुगार खेळणारे ३, खेळवणारे २ व पाहीजे आरोपी २ असे व ५ अनोळखी इसम ( पळून गेलेले ) असे एकुण १२ आरोपी हे जुगार खेळत आसण्यारेया रिक्षा मध्ये छापा घातला पोलिस आले असल्याचे कळताच काही जुगार घेणारे व जुगार खेळणारे तेथुन पळुन गेलेले व काही जुगार खेळणारे व घेणारे ७ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार ४० रूपये चा मुद्देमाला जप्त केला. सदर अटक आरोपींविरुध्द सदर अटक/कारवाई केलेल्या आरोपींविरुद्ध स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. १५९/२२, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्रीनिवास घाटगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील वपोनि राजेश पुराणिक, मपोउनि पंढरकर, पोह मोहिते, पोह राणे, पोना माने, पोना जमदाडे, पोना पठाण, पोशि कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे