आळंदीत आ.दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

आळंदीत आ.दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

आळंदी,दि.२७ :- खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण हक्क परीषद,मा.नगरसेवक प्रदिप बवले आणि संदेश तापकीर  यांच्या संयुक्तविद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आळंदी देहू फाटा येथे आयोजन करण्यात आले होते.आळंदी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती मा.नगरसेवक प्रदिप बवले आणि संदेश तापकीर यांनी दिली.
यावेळी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर,माजी नगरसेविका मंगलाताई वेळकर,विजय तापकीर,गौरी गोळे,दिपक खेंडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
मधुमेह,रक्तगट,ईसीजी,हिमोग्लोबीन,रक्तदाब,डोळे तपासणी आदींची मोफत तपासणी करण्यात आली.या शिबिरामध्ये‌ शल्यचिकित्सक,अस्थिरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ,हृदयरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ,दंतचिकित्सक,त्वचारोगतज्ज्ञ,आयुर्वेदाचार्य,जनरल फिजिशीयन,फिजिओथेरपिस्ट आदी विविध वैद्यकीय शाखेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.
संकटकालीन प्रथमोपचार या विषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले. ऍंजिओप्लास्टी,बायपास सर्जरी,मुतखडा शस्त्रक्रिया,व्हेरिकोजव्हेन्स शस्त्रक्रिया,मोतिबिंदू शस्त्रक्रिया,इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजि,रेडीएशन थेरपी,कर्करोग शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया नामांकित रुग्णालयांत मोफत अथवा वाजवी दरांत करण्य़ाचे मार्गदर्शन देखील रुग्णांना यावेळी करण्यात आले.

आळंदी प्रतिनिधी:-दिनेश गणपत कुऱ्हाडे