हर घर तिरंगा अभियान पुणे महानगरपालिके मार्फत विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न

हर घर तिरंगा अभियान पुणे महानगरपालिके मार्फत विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न

पुणे,दि.०५:- १५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत . त्या निमित्ताने केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम आयोजित केला आहे . या निमित्त पुणे महानगरपालिकेकडून " हर घर तिरंगा " उपक्रमा अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा , क्षेत्रीय कार्यालय , पुणे स्मार्ट सिटी यांचेकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत . या अभियानांतर्गत बालेवाडी येथे बालेवाडी वेलफेयर फेडरेशन तर्फे वृक्षा रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . त्यानिमित्त स्मार्ट सिटी सीईओ मा.डॉ संजय कोलते व मा . सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले . तसेच मा . सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांनी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रहिवासी असणारे स्वातंत्र्य सैनिक यांचे निवास स्थानी जाऊन त्यांना शाल श्रीफळ व गुलाबाचे फुल देऊन कृतज्ञता व्यक्त केली . श्री . विकास मोरे ( वरीष्ठ आरोग्य निरीक्षक ) , सचिन बिबवे ( आरोग्य निरीक्षक ) ,  संजय कांबळे ( मुकादम ) ,  दयानंद पाटोळे ( मुकादम ) , वैभव साबळे ( वॉर्ड समन्वयक स्वच्छ ) यांनी जिल्हा परिषद शाळा उंड्री येथे पुणे महानगर पालिका व स्वच्छ • संस्था यांच्या वतीने घरोघरी तिरंगा आणि स्वच्छता मोहीम घेतली . यावेळेस मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा माटे , पदवीधर शिक्षक श्री राजेंद्र कुंभारकर उपस्थित होते . सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना घर घर तिरंगा या मोहिमेची माहिती देण्यात आली तसेच स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली . मा . महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी अमृत महोत्सवानिमित्त विविध वीर स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रीडा निकेतन शाळा क्रमांक ८३ बी माळवाडी , हडपसर पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने वेगवेगळ्या रांगोळी , चित्रकला , वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . श्री शिवाजी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे ७ यांच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी मधून जनजागृतीचे संदेश तसेच देश भक्तीची गाणी इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते .