अनधिकृत बांधकामावर लवकरच हातोडा. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार

अनधिकृत बांधकामावर लवकरच हातोडा. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे,दि.२३ :- पुणे शहरातील काही परिसरात अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करावी, व त्यासाठी १५ दिवसांचा मुदत कनिष्ठ अभियंत्यंना  देण्यात येणार आहे. या कालावधीत केलेल्या कारवाईचा अहवाल खात्याकडे सादर करायचा आहे, अन्यथा संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.
त्यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाई लवकरच सुरू होणार आहे.
पुणे शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील सर्व अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते. त्या बैठकीत बोलताना आयुक्तांनी हा इशारा दिला.
पुणे शहराच्या विविध भागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात रहिवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे हॉटेल, अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. काही ठिकाणी रुफ टॉप हॉटेल आहेत. त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करावी, त्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत कनिष्ठ अभियंत्यांनी तातडीने कारवाई करावी. त्या कारवाईचा अहवाल बाधंकाम विभागाकडे सादर करायचा आहे. जे कनिष्ठ अभियंते अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाई लवकरच सुरू होणार आहे.