गौरी गणपती साहित्य जत्राचे पुण्यात भव्य उदघाट्न.

गौरी गणपती साहित्य जत्राचे पुण्यात भव्य उदघाट्न.

पुणे,दि.२८:- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांच्या हस्ते व  अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आणि अभिनेत्री आरती शिंदे यांच्या उपस्थितीत हवेत फुगे उडवून व फीत कापून व दीप प्रज्वलन करून या जत्रेचे उदघाट्न करण्यात आले. या प्रसंगी अरविंद शिंदे ( अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस ), जेष्ठ नेते उल्हास पवार, अभय छाजेड, दीप्ती चौधरी, दीपक मानकर, कमल व्यवहारे, रफिक शेख, पूजा आनंद, बाळासाहेब दाबेकर, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, अजित दरेकर,  वीरेंद्र किराड,व अनेक नेते,  काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

            गौरी गणपती साहित्य जत्रेतील अनेक स्टॉल वर भेट देत महिलांनी  केलेल्या कारीगिरी व कौशल्याची प्रशंसा केली. आलेल्या पाहुण्यांचे आयोजक संगीत तिवारी व अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल, गाईवासरू, तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आले.  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जत्रेचे आयोजन हे खूप सुंदर उपक्रम संगीत तिवारी यांनी घेतले आहे. आपल्या पायांवर उभे राहून स्वयं रोजगार ची संधी या माध्यमातून अनेक महिलांना मिळत आहे, हे खूप आनंदाची बाब आहे. पुण्यातील महिला खप सुंदर वस्तू तयार करतात व ते प्रत्यक्ष पाण्याची संधी मला प्राप्त झाली याचा मला खूप आनंद आहे. माझ्या घरी सुद्धा दरवर्षी गणपती  स्थापन करतो व मी अनेक लागणारे वस्तू येथून खरेदी करणार आहे. संगीता तिवारी हे गेले अनेक वर्ष अस्या प्रकारच्या जत्रा भरवत आहेत, त्यामुळे  अनेक लोकांना आपल्याला लागणारे साहित्य, वस्तू येथे उपलब्ध होणारव खरेदी करता येणार. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.

            गौरी गणपतीनिमित्त सर्व संबंधित वस्तूंची खरेदी "वाती ते मूर्ती" सर्व एकाच छताखाली करता यावी, त्यात दर्जेदारपणा व माफक किंमत असावी आणि महिलांना रोजगार मिळावा या हेतूने या साहित्य जत्रेचे गेले १५ वर्षांपासून आयोजन करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे १३वे वर्ष आहे. यामध्ये सुमारे ७० ते ८० स्टॉल असणार असून महिला बचत गटांच्या स्टॉलला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत असलेल्या बचत गटांना समाविष्ट केले जात असते. या साहित्य जत्रेमध्ये गौरी गणपती मूर्ती, आरतीचे साहित्य, गौरीचे दागिने, मखर व अन्य आरास यासाठी आवश्यक साहित्य त्याचबरोबर मोदक, फराळ व प्रसादाचे पदार्थ, साहित्य व वस्तू आदी रास्त दरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष हा उपक्रम राबविण्यात आला नाही परंतु त्या मागील वर्षी झालेल्या गौरी गणपती साहित्य जत्रेत २१ लाख रुपयांहून अधिक विक्री झाली होती. यावर्षी देखील या महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा गौरी गणपती साहित्य जत्रा महोत्सवाच्या आयोजिका संगीता तिवारी यांनी व्यक्त केली.

 

            दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती साहित्य जत्रेचे आयोजन दि. २७ ते दि. ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत कॉंग्रेस भवनचे पटांगण येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

 पायल तिवारी बिटीया फाऊंडेशन आणि प्रियदर्शनी वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत तिवारी यांनी या जत्रेचे आयोजन केले आहे.