
पुणे,दि.०८:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष घनश्याम भगवानराव निम्हण यांची पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी बोलताना घनश्याम निम्हण बोललेकी माझे काम हे समाजातील तळागाळांतील जनतेपर्यंत पोहचवून काँग्रेस पक्ष बळकट करणार आहे.
यावेळी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष अरविंद शिंदे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .