मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड भागातील शाळा, महाविद्यालये उद्या बंद

मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड भागातील शाळा, महाविद्यालये उद्या  बंद

पुणे,दि.१३ :- पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान विभागाने गुरुवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या (गुरूवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

संततधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी जमा झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. अशी स्थिती असताना त्यातच आता हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा  देण्यात आलेला आहे. मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी ही विलंब होत आहे. अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, "हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गुरुवारी शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल. शुक्रवारी शाळा सुट्टी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारी आढावा घेऊन घेतला जाईल.पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टी, शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीरपिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळेना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत : अनुदानित) ता. १३ ते १४ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
सिंहगड बंद करण्यासाठी जिल्ह प्रशासनाला पत्रपावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गावर दरड कोसळण्याच्या भीतीने पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. त्याशिवाय संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कात्रज जुना बोगद्याजवळ दरड कोसळल्याची घडना घडली आहे. लोणावळ्यात पाचनंतर पर्यटनाला बंदी घातलीगेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहर आणि परसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात अनेक पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पुणे शहराजवळील लोणावळा येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मात्र, कोसळणारा पाऊस आणि संभव्या धोका लक्षात घेता प्रशासनाकडून लोणावळ्यात सायंकाळी पाचनंतर पर्यटनाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोणावळ्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून, भुशी धरणाने रौद्र रूप धारण केले आहे.