धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवास नियम नाही का? रात्री अकरा वाजेपर्यंत लावणीचा कार्यक्रम सुरू

धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवास नियम नाही का? रात्री अकरा वाजेपर्यंत लावणीचा कार्यक्रम सुरू

बीड,दि.०१ : - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानकडून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. मात्र या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी परळी मध्ये लावण्या, अश्लील नृत्य सादर करण्यात आल आहे. एकीकडे अतिशय भक्तिमय वातावरणात बाप्पाचं स्वागत केले जात असताना दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांच्या परळीत हे चित्र पाहायला मिळालं. तर या कार्यक्रमात सर्व नियम पायदळी तुडवत रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता. या ठिकाणी तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठी चार्ज देखील करावा लागला. एरवी सर्वसामान्यांवर कारवाई करणारे पोलीस धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानवर कारवाई करणार का? असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे.