संतशिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पालखी चे आषाढी वारीसाठी क्षेत्र सुदुंबरेतून प्रस्थान

संतशिरोमणी  श्री संताजी जगनाडे महाराज पालखी चे आषाढी वारीसाठी क्षेत्र सुदुंबरेतून प्रस्थान

सुदुंबरे,दि. २१ :-सुदुंबरे येथील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज तेली समाजाचे आराध्य दैवत व संत आणि जगद्गुरु श्री तुकाराम गाथा चे मूळ लेखक अशी ओळख असलेले संत संताजी जगनाडे महाराजांची दिंडी सुदुंबरे येथून तिचे प्रस्थान झाले आहे.
प्रस्थानाच्या वेळी दिंडी व ट्रस्ट चे सर्व सदस्य,अध्यक्ष,खजिनदार तसेच मोठ्या प्रमाणात तेली समाज उपस्थित झाला.
श्री जगनाडे महाराजांची दिंडी तालांच्या गजरात,मृदुंगाच्या नादावर व अभंगाच्या सुमधुर गायणावर सुदुंबरे मधून निघाली.भक्त गणांचा खूप मोठा सहभाग घेतला गेला.
दिंडी प्रमुखांनी सर्व सोई सुविधा दिंडीत सहभागी होणाऱ्यांना देण्याची सोय केली गेली आहे 

दौड प्रतिनिधी :-महेश देशमाने