राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी -सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला, रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा

राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी -सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला, रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा

पुणे,दि.,२२. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :- राजकारणात महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरण आता कायमचे बंद होणार आहे.कारण केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने दिलेला क्लोजर रिपोर्ट सादर केला असून तो रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला केला आहे.आता या प्रकरणात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना अनेक मोठ्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते.याप्ररकणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगगचा ठपका ठेवला होता.व या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशन व मुंबई मधील कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शुक्ला या केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे असताना महाराष्ट्र पोलिसांनी समन्स बजावून त्यांची चौकशी केली होती.शुक्ला यांच्या वर अटक होण्याची शक्यता देखील होती.मात्र महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्या नंतर  सरकारने त्यांना क्लीिनचीट दिली व तपास बंद करण्यात आला.त्यानंतर शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदी बढतीही देण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला होता.सदरच्या तपासात शुक्ला यांच्या या प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे नाहीत असे सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले होते.त्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआय तर्फे सादर करण्यात आला.त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे.त्यामुळे हे प्रकरण पुर्णपणे बंद होणार आहे.दरम्यान या प्रकरणी शुक्ला यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.