चिंचवडला 26 ते 29 कीर्तन महोत्सव चे आयोजन

चिंचवडला 26 ते 29  कीर्तन महोत्सव चे आयोजन

पिंपरी चिंचवड,दि.२५:- दैनिक सकाळ माध्यम समूहाच्यावतीने देहू व आळंदी येथून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊ न शकलेल्या पण विठूरायाच्या दर्शनाची आस असणाऱ्या, आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांना हरिनामाचा महिमा अर्थात सुश्राव्य अशा कीर्तन श्रवणाचा लाभ घेता येणार आहे.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने आषाढी वारी व आषाढी एकादशी निमित्ताने 'नाचू कीर्तनाचे रंगी' या कीर्तनमहोत्सवाचे आयोजन उद्यापासून (ता.२६) चार दिवस चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे.
२६ जून ते २८ जून या दिवशी सायंकाळी साडेचारला तर गुरुवारी (ता. २९) सकाळी नऊला या कीर्तनमहोत्सवाच्या समारोपाचे कीर्तन आयोजित केले आहे. यामध्ये नागपूर येथील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, जगन्नाथमहाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील व यशोधनमहाराज साखरे हे कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत.
समारोप गुरुवारी सकाळी नऊ ते अकरा यावेळेत होईल. विठुरायाच्या नामस्मरणात पंढरीची वारी याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी सकाळ माध्यम समूहाने पिंपरी चिंचवडकरांना उपलब्ध करून दिली आहे. कीर्तनमहोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.
'सकाळ'ने सुरू केलेला 'नाचू कीर्तनाचे रंगी' हा उपक्रम वारकऱ्यांच्या भावना जपणारा आहे. पंढरपूरची वारी या महोत्सवाच्या माध्यमातून भाविकांना अनुभवता येणार असून, सगळ्यांच्या घरी पोहोचलेला हा उपक्रम आहे. भाविकांनी आवर्जून या कीर्तनमहोत्सवास उपस्थित रहावे.
- रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, ज्येष्ठ कीर्तनकार
जसा पुंडलिकाने देव वैकुंठाहून भूतळा आणला; संत भानुदास महाराजांनी अनागोंदीहून विठ्ठल पंढरीला आणला; तसा 'सकाळ'ने पंढरीच्या वारीचा आनंद कीर्तनमहोत्सवाच्या माध्यमातून आणला असून, हा उपक्रम आदर्शवत आहे. भाविकांनी आवर्जून या कीर्तनमहोत्सवास उपस्थित रहावे.
- जगन्नाथ महाराज पाटील, प्रसिद्ध कीर्तनकार
महाराष्ट्राचा देव विठोबा, भक्तीपीठ हे पंढरपूर आणि आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे. या लोकधर्माचा जागर जो करतो, तो वारकरी असून, याच वारीचा अनुभव संत विचाराच्या माध्यमातून 'नाचू कीर्तनाचे रंगी' या सकाळ आयोजित कीर्तनमहोत्सवातून भाविकांना मिळणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असा आहे.
- पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रसिद्ध कीर्तनकार
वारीमध्ये पंढरीस जाऊन चंद्रभागे स्नान। विधी तो हरिकथा, असा नियम सांगितला आहे. 'सकाळ'ने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात हरिकथा श्रवण होणार आहे. त्याने श्रोत्यांच्या मनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित व्हावा हीश्री पांडुरंग चरणी प्रार्थना. नाचू कीर्तनाचे रंगी हा स्त्युत्य उपक्रम आहे.
- यशोधन महाराज साखरे, प्रसिद्ध कीर्तनकार
काय? कुठे? कधी? केव्हा? कसे?

काय? : 'नाचू कीर्तनाचे रंगी' कीर्तन महोत्सव

कुठे? : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

कधी? : २६ ते २९ जून

केव्हा? : सोमवार ते बुधवार दुपारी ४.३० ; गुरुवार सकाळी ९

कसे? : प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक

(टीप : प्रवेशिका शनिवारपासून उपलब्ध)

प्रवेशिकांसाठी संपर्क

रोशन : ९५४५९८११५९

प्रशांत : ८३८००७४८२३

कीर्तनांची वेळ व कीर्तनकार

सोमवार, ता. २६ : दुपारी ४.३० : रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, नागपूर

मंगळवार, ता. २७ : दुपारी ४.३० : ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील, मुंबई

बुधवार, ता. २८ : दुपारी ४. ३० : ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी

गुरुवार, ता. २९ : सकाळी ९ : ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, आळंदी

येथे मिळतील प्रवेशिका

सकाळ पिंपरी कार्यालय : 'बी-झोन' बिल्डिंग, ५ मजला, ऑफीस नं. ५०७ ते ५१०, जुना पुणे-मुंबई महामार्ग, एम्पायर इस्टेटजवळ, पिंपरी.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड संपर्क : ७६२०८८७३१७

दिनेश अॅडस् : बिग इंडिया चौक, सेक्टर २५, निगडी प्राधिकरण - ८९७५७६१८६३

गुरुकृपा बुकस्टॉल : अंकुश लांडगे मिनी मार्केट, आळंदीरोड चौक, भोसरी एसटी स्टँड जवळ - ९८५००३९७११

अमृता सिल्क साडी : साई कुटीर बिल्डिंग, शॉप क्र. २/३/४, नवी सांगवी, ९७६२१५९८३१

मा. नगरसेविका अपर्णा डोके : यांचे जनसंपर्क कार्यालय - विठ्ठल मंदिरा जवळ, तानाजी नगर, ९८२३५४६०१४

मा. नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे : यांचे जनसंपर्क कार्यालय - मोरया गोसावी मंदिरा जवळ, चिंचवड गाव, ७७१९०९२९२९