चाकण पोलिसांनी पकडला एक कोटी एक लाख वीस हजार रुपयांचा गुटखा

चाकण पोलिसांनी पकडला एक कोटी एक लाख वीस हजार रुपयांचा गुटखा

पिंपरी चिंचवड १० ( प्रतिनिधी ) पुणे नाशिक महामार्गावर अवैधरित्या गुटखा घेऊन जाणारा टेम्पो चाकण पोलिसांनी पकडून एक कोटी एक लाख वीस हजार रुपयांचा गुटखा जप्त करून एकास अटक केली आहे.
सदर घटनेबाबत चाकण पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की त्यांना एका खाबऱ्यामार्फत बातमी मिळाली की पुणे नाशिक महामार्गावरून. टेम्पो क्रमांक एम एच 22 ए ए 17 20 हा गुटखा घेऊन जाणार आहे पोलिसांनी वाकी खुर्द चाकण या ठिकाणी सापळा रचून स्पीड बेकर वर सदर टेम्पो पकडला टेम्पोमध्ये 91 लाख 20 हजार रुपयांचा गुटखा व टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण एक कोटी एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. व गणेश विठ्ठल भाडळी वय 32 राहणार कोयळी तालुका खेड जिल्हा पुणे दाखल करून त्याला अटक केली आहे. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मंच मंचक इप्पार सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कुटे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे पोलीस निरीक्षक देवडे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पो.स.ई निलेश चव्हाण सहायक फौजदार सुरेश हिंगे पोलीस हवालदार संदीप सोनवणे भैरोबा यादव हनुमंत कांबळे निखिल शेटे पोलीस कॉन्स्टेबल चेतन गायकर नितीन गुंजाळ प्रदीप राणे निखिल वर्पे यांनी कारवाईत भाग घेतला सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड करीत आहे