'अ व्हॅलेंटाईन्स डे' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

'अ व्हॅलेंटाईन्स डे' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

- मराठीतील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट 

'अ व्हॅलेंटाईन्स डे' असे हटके नाव असल्यामुळे चर्चेत असलेल्या मराठीतील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या मराठी चित्रपटाची निर्मिती गोल्डन स्ट्राईप्स  एन्टरटेन्मेंट आणि कियान फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट यांनी केली असून सहयोगी निर्माते अनन्या फिल्म्स आहेत.तर ह्या फिल्म चे कार्यकारी निर्माते सोमनाथ गिरी आहेत.

अजित दिलीप पाटील यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या  'अ व्हॅलेंटाईन्स डे ' या चित्रपटाची टॅगलाईन 'आदमखोरी दुनियेत आपलं स्वागत आहे' अशी असल्यामुळे या चित्रपटात नक्की काय असणार यांची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

लेखक दिग्दर्शक अजित दिलीप पाटील म्हणाले,  'अ व्हॅलेंटाईन्स डे' च्या फर्स्ट लुकची सर्वत्र चर्चा झाली. या चित्रपटात कोण असेल यांची उत्कंठा प्रेक्षकांना होती.  या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी,अभिनेते संजय खापरे,अभिनेते सुरेश विश्वकर्मा, अभिनेते अरुण कदम, संग्राम सरदॆशमुख यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. 

चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचे निर्माते कॅप्टन फैरोज अनवर माजगावकर, कॅप्टन अमजद निराले, चीफ इंजिनिअर श्रीकांत धर्मदेव सिंह आणि सहनिर्माते सुनील यादव यांनी सांगितले की, आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीत रुळलेल्या वाटेवरून न जाता नवीन ट्रेंड आणायचा होता. 'अ व्हॅलेंटाईन्स डे' च्या निमित्ताने आम्ही नव्या दमाचा सिनेमा मराठीत आणणार आहोत. हा चित्रपट मराठीत निर्माण होणार आहे आणि 7 भाषेत डब होणार असुन तो त्या प्रांतात आणि देशात प्रदर्शित करणार आहोत. आणि तो आगामी मॉन्सून मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 चित्रपटातील एक सुंदर गाणे प्रसिद्ध गीतकार संजय नवगिरे यांनी लिहिले आहे.साईनाथ माने हे डिओपी ची जबाबदारी सांभाळणार आहेत.ह्या फिल्म चे फाईट मास्टर बिकास कुमार सिंग आहेत.तर या चित्रपटातील २ गाणी साई पियुष यानीं संगितबध्द कॆली आहॆत.तसेच या चित्रपटाच्या  टेक्निकल टीममध्ये बॉलीवूड व इजिप्शियन फिल्म इंडस्ट्री मधील लोकांचा समावेश आहे.