संत तुकाराम महाराज पालखीचे आज पुण्यात आगमन

संत तुकाराम महाराज पालखीचे आज पुण्यात आगमन

पुणे,दि२२ :-  संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले.आज सायंकाळी 'संत तुकाराम महाराज की जय', या जयघोषात पुण्यात आगमन झाले.
संचेती पुलाजवळ संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी ५.४५ वाजता आली. पुणे बार असोसिएशनच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. संत तुकारामांची पालखी नानापेठेतील निवडूंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामाला असते.  पालख्यांबरोबर असलेल्या दिंड्यांचा मुक्काम दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पुण्यातील सर्वच रस्ते, गल्लीबोळ बुधवारी 

दिवसभर गजबजलेले होते. खांद्यावर पताका, हातात चिपळ्या व डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी, त्यांच्यासमवेत डोक्यावर तुळशीवृदांवन घेतलेल्या महिला यामुळे रस्ते रंगबेरंगी दिसत होते. रस्त्याने जाताना वारकरी सामुहिक अभंग तसेच जयघोष करत होते.पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झूंबड उडाली होती. कोरोनामुळे पालखीचा सोहळा तीन वर्षे झालाच नाही. त्यामुळे भक्तांना दर्शनाची आस लागली होती. अनेक पालकांनी बरोबर आणलेल्या लहान मुलांनाही पादुकांवर डोके टेकवायला लावून त्यांच्यात विठूदर्शनाची ओढ निर्माण केली. अनेक तुरूण मुलेमुलीही ग्रूप करून दर्शनासाठी आली होती. पालखी मार्ग ठिकठिकाणी रांगोळीने सजवण्यात आला होता. दिंडीतील वारकऱ्यांच्या विठूनामाच्या, ज्ञानेबातुकोबाच्या जयघोषाला भाविकांचीही साथ मिळत होती.
संत तुकाराम महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात विसाव्यासाठी जाणार आहे. उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे. पुणे शहर पोलीसांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांचा संघ चांगली वागणूक व वारकऱ्यांच मन जिंकले आहे पुणे शहर पोलिस आयुक्त यांनी  चोख बंदोबस्ताची पाहणी केली