
मुंबई, दि.१२ ( झुंजार ऑनलाइन ) महाराष्ट्र राज्य मधील शासकीय व जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारक व त्यांच्याबरोबर इतर वेतनधारक यांना.३४/टक्के महागाई भत्ता व डि.ऐ .३ / फरकासह लागू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना डि . ऐ. वाढायची प्रतीक्षा लवकर संपेल.
यापूर्वी नुकतीच केंद्र केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालय कडून ग्राहक किंमत निर्देशक जाहीर करण्यात आला आहे. त्या निर्देशकाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३८/दराने लागू करण्याबाबतच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने जानेवारी 2022 पासून 34% महागाई भत्ता डी ए फरकासह लागू करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून परवानगी दिली आहे. याबाबतची अधिकृत शासन निर्णय लवकरच वित्त विभागाकडून निर्गमित केला जाईल. सदरचा महागाई भत्ता जानेवारी 2022 पासून लागू करण्यात येणार आहे. जानेवारी ते जून या कालावधीचा डि. ऐ .फरक जुलै महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून ची डी ए वाढीची प्रतीक्षा आता संपणार आहे.