३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्ड कनेक्शन आले समोर

३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्ड कनेक्शन आले समोर

मुंबई,दि.०९ ( प्रतिनिधी ) नुकत्याच सी बी आय ने मुंबई व अन्य ठिकाणी ३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या व्यक्तींच्या घरी छापेमारी केली.यात म्हागाड्या पेंटीग व मूर्ती जप्त केल्या आहेत.यातील एकाचे अंडरवर्ल्ड शी संबंध असल्याचे सीबीआय सूत्रांकडून सांगण्यात आले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने 34 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई व अन्य ठिकाणी छापेमारी केली या छापेमारीत माहागाड्या पेंटींग्ज व मूर्ती असा एकूण 40 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बँक घोटाळ्यातील पैशांमधून सदरच्या पेंटिंग व मूर्ती खरेदी केल्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचा दावा आहे. तसेच या घोटाळ्यातील काही रक्कम घोटाळ्यातील व्यक्तींनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांना दिली आहे. हा तपास करताना घोटाळ्यातील एका व्यक्तीचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्याशी संबंध असल्याचा दावा सूत्रांनी दिला आहे. या छाप्यात रेबिका दिवाण व अजय रमेश नावंदर यांची नावे समोर आले आहेत. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग पुढील तपास करत आहे.