लोणावळ्यात पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून ऐवज लुटणारा आरोपी 3 तासांच्या आत पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

लोणावळ्यात पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून ऐवज लुटणारा आरोपी 3 तासांच्या आत पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

पुणे ग्रामीण,दि.,२१. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :- पुणे ग्रामीण परिसरातील लोणावळ्यात पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू व रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या आरोपीच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात. अखिल सलीम व्होरा याला पोलिसांनी अटक केली आहेत.आरोपीकडून बारा लाखांचा मुद्देमान पोलिसांनी जप्त केला आहे.लोणावळामध्ये मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातून पर्यटक येतात. त्याचबरोबर भुशी धरण, लाईन्स पॉईंट, टायगर पॉईंट  पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीच्या काचा फोडून मोबाईल, रोख रक्कम, पर्स असा ऐवज चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना भाजे परिसरामध्ये आरोपी अखिल सलीम व्होरा हा संशयित रित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अखिल ला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केल आहे. आरोपीकडून सहा मोबाईल, पाच पर्स, दोन पॉवर बॅंक, घड्याळ, इनोव्ह कार असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई 
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक  मितेश गट्टे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तीक, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन किशोर धुमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहा. फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजयभाऊ मुंढे यांचे पथकाने केलेली असुन गुन्ह्यांचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.