अफूचा चुरा सिलेंडरच्या टेम्पोतून तस्करी करणारा आरोपी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

अफूचा चुरा सिलेंडरच्या टेम्पोतून तस्करी करणारा आरोपी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड,दि.,२४. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :-
पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाळुंगे गावात छापा टाकून  तिघांना ताब्यात घेतले. हे  राजस्थान येथून अफूचा चुरा आणून त्याची पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी विक्री करीत होते. त्यांच्याकडून 58 किलो.288 ग्रम वजनाचा अफूचा चुरा आणि अन्य साहित्य असा एकूण 16 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.राकेश जीवन्राम बिष्णोई, कैलास जोराराम बिष्णोई, मुकेश गिरधारीराम बिष्णोई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिलकुमार जाट या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे काहीजण अफूचा चुरा आणून त्याची विक्री करण्यासाठी साठवणूक करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून 58 किलो.288 ग्रम अफूचा चुरा, एक टेम्पो, चार मोबाईल फोन, 82 सिलेंडर टाक्या, एक वजनकाटा, एक मिक्सर, रिफिलिंग पाईप, सिलिंग पॅकिंग आणि रोख रक्कम असा एकूण १६ लाख ७० हजार १२२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी हासिलेंडरच्या गाडीतून हा अंमली पदार्थ आणला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.ही कारवाई. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त,विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त.डॉ.संजय शिंदे, , अपर पोलीस आयुक्त. वसंत परदेशी,पोलीस उप आयुक्त, गुन्हे,स्वप्ना गोरे,सहा पोलीस आयुक्त, गुन्हे,  सतीश माने, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १.बाळासाहेब कोपनर,  यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप निरीक्षक राजन महाडीक, ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, अशोक गारगोटे, बाळासाहेब सुर्यवंशी, मयुर वाडकर, संतोष भालेराव, दादा धस, अजित कुटे, रणधीर माने, मितेश यादव, पांडुरंग फुंदे, बाळु कोकाटे यांचे पथकाने केली आहे