4 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पुणे महापालिकेच्या कंत्राटदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

4 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पुणे महापालिकेच्या कंत्राटदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे,दि.,२३. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :- पुणे महापालिकेच्या गाडीवर दररोज काम देण्यासाठी कंत्राटदाराकडून ४ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्टार्टर (वाहन वाटप) ला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.२२) केली आहे.पांडुरंग साधू लोणकर , वय ५७ वर्ष,  पद - स्टार्टर ( वाहन वाटप ) (वर्ग-३), नेमणूक  - पुणे मनपा, व्हेईकल डेपो, गुलटेकडी, पुणे.असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हे खाजगी कंत्राटी वाहन चालक आहेत. यावेळी आरोपी पांडुरंग साधू लोणकर यांनी तक्रारदार यांना मनपाच्या गाडीवर दररोज काम नेमून देण्याकरिता ४ हजार रुपयांची लाच मागितली. यावरून १६ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली होती.
त्यानुसार मंगळवारी स्वारगेट येथे चहाच्या टपरीवर सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले असून, खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.पुणे.अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.श्रीमती शीतल जानवे,पोलीस निरीक्षक- विरनाथ माने,पो.शि. रियाज शेख, पो. शि. माने,पो. शि. पांडुरंग माळी,यांनी  केली.
व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
नितिन जाधव,.पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे. 
कार्यालय क्र. 020 26132802
ईमेल dyspacbpune@gmail.com , dyspacbpune@mahapolice.gov.in
टोल फ्री क्र. 1064